मनोज जरांगे यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
1 min read
जालना दि.९:- उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. अजित पवार यांनी आपल्या पक्षात साप पाळले असून, ते मराठा समाजाविरोधात उघडपणे भूमिका घेत असल्याची टीकाही जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांचा रोख छगन भुजबळ व बीडमधील ओबीसी मोर्चाकडे होता. “छगन भुजबळ हे मराठ्यांना शत्रू मानत आहेत. अनेक समुदायातील लोकांना ते मराठ्यांविरोधात फितवण्याचे काम करीत आहेत.
बीडमध्ये मराठा समाजाविरोधात जो मोर्चा काढला जाणार आहे, तोदेखील अजित पवार पुरस्कृत असेल. एक दिवस आमचे शब्द खरे ठरतील आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल”, असा इशाराही जरांगे यांनी अजित पवारांना दिला.
