मी गाडी चालवत नव्हते; गाडीतही नव्हते. माझ्याविषयी वाईट बोलणे थांबवा:- गौतमी पाटील

1 min read

पुणे दि.९:- मुंबई-बंगलोर महामार्गावर नवले पूल येथे झालेल्या अपघातातील गाडी मी चालवत नव्हते. गाडीतही नव्हते. त्यामुळे मी दोषी नाही आणि मलाच दोषी का ठरवले जात आहे ? माझ्याविषयी वाईट बोलले जात आहे, ते आता थांबवा. मी अपघाताच्या ठिकाणी नव्हते. मला या गोष्टीसाठी ट्रोल करणे थांबवा. ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, असे मत नृत्यांगना गौतमी पाटील यांनी आज (बुधवार, दि. ८) पुण्यात केले आहे. पत्रकार परिषदेत व्यक्तन नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाल्या, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना हा विषय कदाचित माहिती नसेल म्हणून ते बोलले असतील. काही दिवसांपूर्वी पुण्यात गौतमी पाटील यांच्या वाहनाला अपघात झाला, त्या वाहनात पाटील होत्या, अशी चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना त्या बोलत होत्या. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर पाटील म्हणाल्या,चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन लावला,त्यावेळी समोरील अधिकाऱ्यांनी व्यवस्थित माहिती दिली. पण, कदाचित चंद्रकांत पाटील यांना हा विषय माहिती नसेल, म्हणून ते बोलले असतील. मात्र, त्याविषयी जास्त काही सांगता येत नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाईट वाटले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला सर्वच बोलतात. मला कोणी चांगले म्हणतच नाहीत. मला सगळे वाईटच बोलतात, मग मी चांगले नृत्य केले असले तरीही वाईट बोलतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!