अनामप्रेम संस्थेचा पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना मदतीचा हात
1 min read
अहिल्यानगर दि.७:- महाराष्ट्रसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील महिन्यात निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतकरी आणि दिव्यांग बांधवांवर खूप मोठे संकट कोसळले. या कठीण प्रसंगी अहिल्यानगरमधील अनामप्रेम संस्था पूरग्रस्त भागांमध्ये दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी पुढे सरसावली आहे. अनामप्रेम संस्थेने शेवगाव तालुक्यातील मुंगी, हातगाव, गदेवाडी, जोहारापूर, लाडजळगाव व वरुर खुर्द या गावांत तर पाथर्डी तालुक्यातील भालगाव, मीडसांगवी, भवरवाडी, माळेवाडी या गावांतील दिव्यांग बांधवांना घरोघरी जाऊन किराणा किट वाटप केले.
अहिल्यानगर येथील अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याच्या या उपक्रमात प्रवीण नवले, रामदास काकडे व रोहित लाटणे यांनी परिश्रम घेऊन दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष भेटून आधार देण्याचे काम केले. संस्थेतील पदाधिकारी इंजि. अजित माने, डॉ. मेघना मराठे,
डॉ. बापूसाहेब कांडेकर, सीए अशोक पितळे, अनिल गावडे, अभय रायकवाड यांनी किराणा सामान जमा करण्यासाठी तर विष्णू वारकरी, बद्रिनाथ कुटे, भारती सोनवणे, शुभम आणि अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांनी किराणा किट भरण्यासाठी मेहनत घेतली.