निमगाव सावात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

1 min read

निमगाव सावा दि.६:- माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि संकल्प युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे दि. 18 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या दरम्यान जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित केल्याचे जुन्नर प्रीमियम लीगचे अध्यक्ष परेश घोडे यांनी सांगितले.जुन्नर प्रीमियर लीगचे हे 12 वे पर्व असून आजपर्यंत अखंडितपणे जुन्नर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनातून श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संकल्प युवा ग्रुप, ग्रामस्थ निमगाव सावा तसेच दानशूर देणगीदार यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात येते. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 1 लाख 25 हजार रुपये बक्षीस द्वितीय क्रमांकास 1 लाख रुपये तृतीय क्रमांकास 75 हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांक 51 हजार रुपये बक्षीस याप्रमाणे तसेच वैयक्तिक आणि सांघिक अजून इतरही अनेक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आहेत.या स्पर्धेची वैशिष्ट्ये म्हणजे भव्य असं क्रिकेटचं मैदान, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी बसण्याची सुविधा, पार्किंगची सुविधा उत्कृष्ट,नामवंत क्रिकेटपटू, विविध राज्यातील आयकॉन खेळाडू आणि संघ मालक यामुळे अल्पावधीतच नावाजलेली ही स्पर्धा चालू वर्षी पुन्हा त्याच जोमाने पार पडत आहे. या स्पर्धेसाठी सर्वच क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहून क्रिकेटच्या या महासंग्रामाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्याकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!