पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू;अशी करा नोंदणी

1 min read

पुणे दि.६:- मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे पदवीधर मतदान नोंदणी अभियान दिनांक 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेले आहे.तरी ज्या व्यक्तींचे नोव्हेंबर 2022 पूर्वी पदवीधर शिक्षण पूर्ण झालेली आहे अशांनीच पदवीधर मतदार नोंदणी करायची आहे. खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून आपली मतदार नोंदणी करून घ्यावी.पदवीधर मतदार नोंदणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे,कलर फोटो – 1,आधार कार्ड झेरॉक्स – 1
पॅनकार्ड झेरॉक्स – 1,पदवी सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ची झेरॉक्स – 1 ( नोव्हेंबर 2022 पूर्वी पदवीधर )जास्तीत जास्त संख्येने पदवीधर मतदार नोंदणी करावी ही विनंती.
तसेच आपण ऑनलाइन नोंदणी पण करू शकता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलला भेट द्या: https://voters.eci.gov.in/. नवीन मतदार नोंदणीसाठी ‘फॉर्म १८’ शोधा आणि तो निवडा. हा पदवीधर मतदारसंघासाठी आहे.फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. भरलेला फॉर्म सबमिट करा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!