दार्जिलिंगसह पूर्व नेपाळ मध्ये भूस्खलन,६९ हून अधिक जणांचा मृत्यू,मोठ्या संख्येने नागरिक ढिगाऱ्यांखाली

1 min read

दार्जिलिंग/काठमांडू दि.६:- पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगसह पूर्व नेपाळच्या विविध भागांत रविवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ६९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने नागरिक ढिगाऱ्यांखाली अडकल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आहे.स्थानिक प्रशासनांच्या वतीने तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, पावसामुळे नागरिकांची घरे वाहून जाण्याबरोबरच रस्ते उद्ध्वस्त झाले असून, दोन्ही ठिकाणी शेकडो पर्यटक अडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि जिल्हा प्रशासनांच्या अहवालांनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील सारसली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नगरकाटा आणि मिरिक तलाव परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. भूस्खलनात सर्वाधिक प्रभावित झालेल्या मिरिकमध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तसेच सात जणांना ढिगाऱ्यांतून बाहेर काढण्यात यश आले. दार्जिलिंगमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापक पथक, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून नागरिकांचे बचावकार्य सुरू असल्याचे दार्जिलिंगच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) रिचर्ड लेप्चा यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!