WhatsApp वर ‘Hi’ पाठवा अन् गॅस सिलिंडर बुक करा!
1 min read
पुणे दि.६:- देशातील प्रमुख गॅस कंपन्या इंडेन, एचपी, आणि भारत गॅस यांनी ग्राहकांसाठी ही सोय सुरू केली आहे. यामुळे आता ना कॉल करावा लागणार, ना वेबसाइटवर लॉगिन करावं लागणार. फक्त काही सेकंदांत बुकिंग पूर्ण होणार आहे.
गॅस कंपन्यांचे WhatsApp नंबर: HP Gas: *9222201122*, Indane Gas: *7588888824*, Bharat Gas: *1800224344*
व्हॉट्सॲपवर गॅस सिलिंडर बुकिंग प्रक्रिया:- १) तुमच्या गॅस कंपनीचा WhatsApp नंबर सेव्ह करा.२) त्या नंबरवर Hi असा मेसेज पाठवा.३) काही सेकंदांत एक ऑटो-रिप्लाय मेसेज मिळेल.४) त्यात *“Gas Booking”* हा पर्याय निवडा.५) तुमचा ग्राहक क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका.६) लगेच बुकिंगची पुष्टी (Confirmation) मेसेज मिळेल!
या सुविधेचे फायदे:
✅ फोन कॉल किंवा लाइनमध्ये उभं राहण्याची गरज नाही.
✅ महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठी सोय.
✅ जलद आणि सुरक्षित बुकिंग प्रक्रिया.
✅ गॅस संपण्याआधी वेळेत बुकिंग करण्याची सुविधा.
✅ गॅस कंपन्यांकडे तक्रार आणि इतर सेवा नोंदवण्याचीही
सोय! “सर्व ग्राहकांनी ही WhatsApp सुविधा वापरावी. वेळ, मेहनत आणि त्रास — तिन्ही गोष्टींची बचत होईल!”
