मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत चैन चोरणारा अटक

1 min read

आळेफाटा दि.४:- मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेवून हातचलाखीने गळयातील सोन्याची चैन चोरणारा पर जिल्हयातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलीसांकडून अटक करून ५ लाख ७७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२८ ऑगस्ट रोजी चालु असलेल्या मराठा आंदोलन रॅली वडगाव आनंद (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत

आल्यानंतर शशीकांत नामदेव देवकर यांची दिड तोेळे वजणाची सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा दि.३१ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने गुन्हे शोध पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना, नमुद गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ परिसरातील पाहीलेले सी. सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील संशयीत आरोपी

अभिजीत शरद पवार (रा. नवगन राजुरी ता.जि.बिड हा राजगुरूनगर) येथिल परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथक हे तात्काळ राजगुरूनगर येथे जावून सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपी अभिजीत शरद पवार यांस ताब्यात घेवून त्यास

गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने अजिंक्य कैलास निमसे रा.आळे यांची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व ऋषीकेश दिंगबर झिंजांड रा.आळेफाटा यांची विस ग्रॅम

वजनाची सोन्याची चैन या दोन व्यक्तीच्या गळयातील चैन चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून ५ लाख ७७ हजार २०० रुपये किंमतीच्या ५२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चैन गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थान.गु.शा.पुणे ग्रामीणचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या

सूचनाप्रमाणे पो.हवा.विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, सुनील गिरी नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!