आपट्याच्या पानांना यंदा तिप्पट दर

1 min read

आळेफाटा दि.४:- सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले असून सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.त्यामुळेच की काय पण यंदा दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांनी ही भाव खाल्ला. आपट्याच्या पानाला दसऱ्याच्या दिवशी गावरान पानांना ३० रुपयांना जुडी भाव मिळाला व हायब्रीड आपट्याच्या पानांना २० रुपये असा भाव होता. गतवर्षी १० रुपयाला भेटणारी आपट्याची पानं यंदा ३० रुपयांना ग्राहकांना घ्यावी लागली. सराफा बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे या दसऱ्याच्या सोन्याचे ही दर वाढलेले बाजारात दिसून आले. आळे (ता.जुन्नर) येथे बाजारात विक्रीसाठी ठेवलेत आलेल्या आपट्याच्या पानाला मोठी मागणी होती. त्यामुळे येथे पानाला ३० रुपयाचा भाव मिळाला. दिवसेंदिवस आपट्याच्या झाडांची संख्या ही कमी होत आहे. त्यामुळे सुद्धा भाव वाढ झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!