निमगाव सावा त मोरया प्रतिष्ठाणने जपली परंपरा
1 min read
निमगाव सावा दि.३:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे गुरुवार दि.2 व शुक्रवार दि 3 या कालावधीत पारंपारीक वाद्यांच्या गजरात देवींच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. या वर्षी गणेश विसर्जनादरम्यान येथील कुकडी नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. याची दखल घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते किरण गोत्राळ यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मोरया प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वर्षी देवींच्या मुर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जन व नवरात्रौत्सव काळात जमा होणारे निर्माल्य त्यामध्ये फळे, फुले, नारळ, हार, केळीचे खुंट, डेकोरेशनमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टीक, थर्माकॉल तसेच नदीपात्रात टाकले जाते त्यामुळे नदीपात्रात प्रचंड प्रदुषण होते.
मोरया प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध मंडळांकडून हे निर्माल्य जमा केले जाते व दुरवर खड्डा खणून त्यात टाकून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. हा उपक्रम गेली आठ वर्षे हे मोरया प्रतिष्ठाण राबवित आहे. किरण गोत्राळ व त्यांच्या या प्रतिष्ठाणच्या दोनही उपकमांचे येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.