नेवासे तालुक्यात खासगी साखर कारखान्यांमुळे सहकारी साखर कारखान्यांची यंञणा झाली सतर्क!

1 min read

नेवासे दि.३:- राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सहकार चळवळीतून एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याने सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उभे करुन राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि याच माध्यमातून राज्याच्या अर्थिक व्यवस्थेत मोठी भर घालण्याबरोबरच नगर जिल्हा हा सुजलाम् सुफलाम् करुन साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामुळे नगर जिल्हा अर्थिकदृष्ट्या मोठा संपन्न झालेला आहे अनेक छोटे – मोठे उद्योग व्यवसाय आणि बेरोजगारीवर मात करुन साखर उद्योगामुळे जिल्ह्यातील बळीराजा हा मोठा डामाडौलात उभा असतांनाच येथील सहकार महर्षी लोकनेत्यांनी यासाठी मोठी अपार मेहनत घेवून एकट्या नगर जिल्ह्याचा या सहकार चळवळीत मोठा मोलाचा वाटा असल्याचे वास्तव चिञ उभे आहे.नेवासा तालुक्यात लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील आणि जेष्ठ नेते माजी खासदार साहित्यिक यशवंतराव गडाख पाटील यांनी तालुक्याच्या उजाड माळरानावर नंदनवन फुलवून नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांना साखर उद्योगातून मोठे सुगीचे दिवस प्राप्त करुन दिलेले असतांना या तालुक्यात आता माञ सहकारी साखर कारखान्याला खासगी साखर कारखान्यांमुळे मोठी स्पर्धा करण्याची वेळ आलेली आहे एकेकाळी शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीसाठी कारखान्याच्या स्लिप मास्तरांपासून थेट चेअरमनपर्यंत ऊस घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांना वशिलेबाजी करुन खेट्या माराव्या लागत होत्या आता माञ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कातच ही कारखानदार मंडळी आलेली असून अशी उलटी गंगा वाहण्यास नेमकी का? आणि कशामुळे सुरुवात झाली? असा कटू प्रसंग नेमका का उभा राहीला? याबाबत सहकार चळवळतील कारखानदारांनी याचा आता अंतमुर्ख होवून विचार करण्याची वेळ आलेली असल्याची चर्चा नेवासे तालुक्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यातून मोठी चवीने चर्चेली जात आहे.सहकार चळवळीतील बहूतांशी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या घामातून उभी केलेली कामधेनू हा उद्योग चालवितांना याकडे काही वेळेस राजकारण म्हणून सहकार चळवळीचा वापर केल्यामुळेच याच्या झळा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुर्वी बसल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या खोडक्याही झाल्याचे जाणकार मंडळीतून आता खुलेआमपणे बोलले जात असतांनाच शेतकऱ्यांच्या घामातून पीकविलेल्या ऊसाचा भाव हा यापुर्वी कारखानदारांच्या मनावर ठेवून कोणीही त्यांना जाब विचारण्यास धजावत नव्हते आणि अशी परिस्थितीही त्यावेळी नसल्यामुळे शेतकऱ्यांची ‘आडवा आणि जीरवा’ हा एककलमी कार्यक्रम राबविण्याची स्पर्धाच काही काळी सुरु असल्याचे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून उघडपणे बोलले जात असतांनाच आता नेवासे तालुक्यात माजीमंञी विजयबापू शिवतारे यांचा वरखेड येथे तिसरा खासगी साखर कारखाना उभा राहिलेला आहे. तर चौथा खासगी साखर कारखाना तालुक्याचे भूमीपुञ पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक प्रभाकर (काका) शिंदे यांनी वैजापूर तालुक्यात सुरु केल्यामुळे आता नेवासे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या खासगी साखर कारखान्याचा मोठा पर्याय उभा राहील्यामुळे सहकार चळवळीतील साखर कारखानदार या खासगी साखर कारखान्यामुळे मोठे ताळ्यावर आलेले असून आता तेच स्वता:हून शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांची यंञणा सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे ठेवून आपला ऊस आपल्याच कारखान्याला देण्यासाठी सोयीस्कर ताळेबंदरित्या व्युहरचना आखण्याचे काम करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता त्यांच्या घामाचे ‘दाम’ आणि सर्वाधिक जादा भावही देण्याचे जाहीर केले जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता कारखानदारांच्या यंञणेच्या पुढे – पुढे न करता कारखानदारच शेतकऱ्यांच्या संपर्कात येवू लागल्यामुळे ऊस ऊत्पादक शेतकरी आता मोठ्या तोऱ्यात वावरु लागला असल्याचे चिञ नेवासे तालुक्यात उभे राहीलेले आहे.नेवासे तालुक्यात माजी मंञी विजयबापू शिवतारे आणि पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर (काका) शिंदे यांच्या खासगी साखर कारखान्यामुळे सहकार चळवळीचा आता राजकारणाला सद्यपरिस्थितीत उपयोग होणार नसल्याचे सहकार चळवळीतील जाणकार नेत्यांनी हेरुन किमान आपल्या कार्यक्षेञातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तरी आपल्या कारखान्यात आणण्यासाठी व्युहरचना आखून सर्वाधिक भाव देण्याची भूमिकाही ते घेत असल्यामुळे बळीराजा आता मोठ्या डामाडौलात वावरतांना दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!