विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
1 min read
बोटा दि.२८:- विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा (ता.संगमनेर) येथे फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट शपथ घेतली.
या शपथविधी प्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यसेवेसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी मार्गदर्शन केले.तसेच या प्रसंगी प्रा. रुपाली तांबे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी या क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले.
औषधांचे महत्त्व, रुग्णसेवेत फार्मासिस्टची भूमिका तसेच समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी क्विझ स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिपाली कुरकुटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. मेघा किरवे यांनी मानले.हा कार्यक्रम प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला.
