पेठ गावात दोन गट भिडले;तुफान हाणामारी; ३० जणांवर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल

1 min read

मंचर दि.२८:- आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना मंगळवार दि.२३ रोजी घडली असून या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे २५ ते ३० जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजय ज्ञानेश्वर तोडकर व आदित्य उर्फ गुल्या बबन नवले यांनी एकमेका विरोधात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी अजय ज्ञानेश्वर तोडकर रा. संभाजी पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर ता. आंबेगाव येथील पवन थोरात, तुषार टेके, शेखर घुले, अमर शेवाळे, धनंजय घेवडे, गणेश वाबळे, गूल्या नवले, जंगम व इतर चार ते पाच अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या राहत्या घरासमोर येऊन बेकायदा गर्दी जमाव करून.फिर्यादी अजय ज्ञानेश्वर तोडकर, पत्नी शारदा, सुन धनश्री, वहिनी चंद्रकला तोडकर, भाऊ काशिनाथ तोडकर, पुतण्या सागर तोडकर यांना लाकडी, दांडके, लोखंडी टॉमीच्या सहाय्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच तोडकर याचे रुद्रांश प्रतिष्ठान ऑफिसमध्ये घुसून वस्तूंची तोडफोड करून वस्तू जाळून नुकसान केले आहे. तसेच घरासमोरील वाहनाची तोडफोड करून घरातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले आहे. तर आदित्य उर्फ गुल्या बबन नवले वय २६ राहणार मंचर-मोरडेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुषार तोडकर, सोमा माठे, ऋषिकेश गुंजाळ, गौरव गोसावी, गणेश बुट्टे, अनिकेत राघमहाले, रितेश नेटके, साहिल नेटके, सोन्या बुट्टे, समीर बुट्टे, मुन्ना माठे, ओमकार बाडेकर, ऋषी पवळे (सर्व राहणार पेठ) व इतर पाच ते सात जणांनी एकत्र येत बेकायदा गर्दी जबाब करून फिर्यादी आदित्य नवले व त्याच्या बरोबर असलेला मित्र स्वप्नील बागल यांना लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी काठ्यांनी मारहाण केली आहे. स्वप्निल बागल याची ऑडी कंपनीची गाडी एम एच १४ एफ क्यू ५००४ ही गाडी फोडून गाडीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे पुढील तपास करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!