धक्कादायक! विमानाच्या चाकाजवळ बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानवरुन थेट दिल्लीला पोहचला
1 min read
नवीदिल्ली दि.२५:- अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीनवर अधिकाऱ्यांनी या मुलाला प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना पाहिले आणि त्याची चौकशी केली त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
१३ वर्षांच्या या मुलाला गुपचूपपणे इराणला जायचे होते. परंतू तो चुकीने भारतात जाणाऱ्या विमानात अशा प्रकार लपला. त्यामुळे तो थेट दिल्लीला पोहचला. या घटनेनंतर काबुल एअरपोर्टवरील सुरक्षेसंदर्भात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार के. ए. एम. एअर फ्लाईट क्रमांक आर.क्यू-4401 ला काबुल ते दिल्ली यायला 94 मिनिटे लागली. या दरम्यान हा अफगाणी मुलगा 94 मिनिटे मिनिटे विमानाच्या पाठच्या चाकाच्यावरील भागात लपून राहिला. हे विमान भारतीय वेळेनुसार काबूलहून सकाळी 8:46 वाजता रवाना झाले.
आणि सकाळी 10:20 वाजता दिल्लीच्या टर्मिनल 3 वर पोहचले.या अफगाणी मुलाने सांगितले की त्याने काबुल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवून प्रवेश केला. त्यानंतर विमान सुटण्याच्या वेळेत व्हीलमध्ये तो लपला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते व्हिल व्हेल मध्ये प्रवास करणे जवळपास अशक्य असते. विमान हवेत उडाल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी होते. आणि वरची थंडीही भरपूर असते. याशिवाय चाकाजवळ जातात त्याच्या आत अडकून मृत्यू देखील होऊ शकतो.
कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी टीएनआयआयला सांगितले की विमानाने उड्डाण घेतल्यानंतर व्हील बेचा दरवाजा खुला रहातो. चाक आत जाते आणि हा दरवाजा पुन्हा बंद होतो. हा मुलगा शक्यता आहे की या बंद जागेत घुसला असेल, जेथे दबाव जास्त असतो.
आणि तापमान प्रवासी केबिन सारखे असावे. तो स्वत:ला वाचवण्यासाठी आतल्या बाजूला चिकटून लपला असावा. ते म्हणाले की अशा स्थितीशिवाय 30,000 फूट उंचीवर जीवंत राहाणे अशक्य आहे, कारण येथे तापमान खूपच कमी असते.
