कांदिवलीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; ७ जण होरपळले; प्रकृती गंभीर; उपचार सुरू

1 min read

मुंबई दि.२४:- मुंबईच्या कांदिवली परिसरात बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार, कांदिवली पूर्वेला असणाऱ्या मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास गॅसचा पाईप लीक झाल्यामुळे हा स्फोट झाला. या स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली.मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. यात वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. आगीत सात जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर ईएसआयसी रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी बहुतांश जण ९० टक्के भाजले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!