भाविकांना दर्शनासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास खुले
1 min read
नाशिक दि.२३:- आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी घटस्थापना करण्यात आल्या आहेत. यात साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगीगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढत उत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे.
दरम्यान, भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करीत देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस देवीचे उपवास व पूजा केली जाणार आहे,
तर भाविकदेखील आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला, तसेच देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार आजच्या पहिल्या माळेला भाविक दर्शनासाठी सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी जाण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रीचे सर्व दिवस भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे देवीचे मंदिर पुढील नऊ दिवस भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.
