जुन्नर च्या पूर्व भागात बैलपोळा निमित्त बैलांची भव्य मिरवणूक

1 min read

आणे दि.२१:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्या निमित्त गावोगावी बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत बैलाला गावातून मिरवण्यात आले. बैलाला सकाळी धुवून व पोळीचा गुळाचा मलिदा प्रसाद म्हणून देण्याची परंपरा जपण्यात आली. बैलांना सजवण्यात हिंगुळ, बेगड, रंग, फुगे, मोरपीस, घुंगरमाळ घालून बैल सजवण्यात आली होती. आणे येथील प्रसिद्ध गाडामालक फायनल सम्राट मयूर पाटील गाडेकर व बैलगाडा संघटना यांचा आने गावात मोठ्या थाटामाटात बैलपोळा साजरा करण्यात आला.बेल्हे येथे प्रसिद्ध गाडा मालक जानकु डावखर व बैलगाडा संघटना यांनी पारंपरिक वाड्याच्या गजरात मिरवणूक काढली. आळे, राजुरी, गुंजाळवाडी,निमगाव सावा ,साकोरी, मंगरूळ, परिसरात बैलांची भव्य मिरवणूक काढली व भंडाऱ्याची उधळण केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!