पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला करणार संबोधित करणार

1 min read

दिल्ली दि.२१:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र अद्याप तरी नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र त्यांनी निवडलेली वेळ महत्त्वाची आहे. जीएसटी 2.0 सुधारणांची अंमलबजावणी होण्याच्या एक दिवस आधी नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान आपल्या भाषणात जीएसटीच्या बदलांवर बोलण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या शक्यता आहेत. त्यात एच1 बी व्हिसा धारकांवर अमेरिकेची कारवाई देखील आहे,ज्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या करांवरही बोलण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!