जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न २० वर्षांपासून प्रलंबित; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

1 min read

बेल्हे दि.१९:- पिंपळगाव जोगा डावा कालवा हा गुळंचवाडी (ता.जुन्नर) पिंपळझाप येथुन गेला त्याला २० एक वर्ष झाली परंतू ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन गेला मायनर ३०/३१ मधिल शेकडो शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे भाऊसाहेब भांबेरे यांच्या नेत्रुत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे कलेक्टर व सिंचन भवन अधिक्षक अभियंता अलका अहीरवे यांची दीड महिन्यापूर्वी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. चर्चेतून शेतकऱ्यांच्या रखडलेल्या मोबदल्याच्या कामास पुढच्या १५ दिवसांत गती देन्याचे अभियंता अलका अहिरवे यांनी सांगितले. परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. आमच्या जमिनी कॅनॉल मध्ये गेल्याततरी आम्हाला पाणीपट्टी भरावी लागते. आमचा मोबदला जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कॅनॉलचे पाणी पुढे जाऊ देणार नाहीत. मोबदला लवकर मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाऊसाहेब भांबेरे, श्रद्धा पेपर एजन्सी मालक पांडूरंग संगमनेरकर, नामदेव येरंडे, नाथा बनकर, दत्त गवांदे, बाळू गुंजाळ व शिष्टमंडळाने दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!