विद्या निकेतन च्या १५ विद्यार्थ्यांची इप्का लॅबोरेटरीज लि. मध्ये निवड
1 min read
बोटा दि.१७:- विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा येथे शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी इप्का लॅबोरेटरीज लि. यांच्या वतीने मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून २०० हून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
कठोर निवड प्रक्रियेनंतर एकूण 55 उमेदवारांची निवड (QA),(QC) तसेच (Production) (Packaging) विभागासाठी झाली. त्यापैकी विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा येथील १५ विद्यार्थ्यांची निवड होणे ही संपूर्ण महाविद्यालयीन परिवारासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण के. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांनी मेहनत, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर ही यशाची उंच झेप घेतली आहे. आगामी काळात आणखी अनेक विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी,”
असे त्यांनी सांगितले.प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख प्रा. सुदर्शन बोरकर यांनी संपूर्ण निवड प्रक्रियेचे उत्कृष्ट समन्वयन केले. “महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर नोकरीच्या संधी मिळवत आहेत, ही संस्थेसाठी गौरवास्पद बाब आहे,” असे ते म्हणाले.
या यशाबद्दल विद्या निकेतन ट्रस्टचे सेक्रेटरी रामदास पोखरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विदुलता पाटील, तसेच संस्थेचे सल्लागार डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यासोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि स्टाफ सदस्यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
