चाईल्डफंड इंडिया चा खिलता बचपन -“आर्ट अँड क्राफ्ट” कार्यशाळा उपक्रम उत्साहात संपन्न

आळेफाटा दि.१७ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सितेवाडी आणि गोद्रे येथे चाईल्डफंड इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘खिलता बचपन’ उपक्रमांतर्गत “आर्ट अँड क्राफ्ट” एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कलाकृती साकारल्या.६ ते १४ वयोगटातील मुलांमधील सृजनशीलता, कल्पकता आणि आत्मविश्वास वाढविणे, कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला,हस्तकला,कागदकाम, रंगकाम यासारख्या विविध कला कौशल्ये शिकता यावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. असे कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे कॉर्डिनेटर अजित सोर यांनी सांगितले.प्रशिक्षक हिंदुराव गेजगे यांनी विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाच्या विविध पद्धती शिकवल्या. यामध्ये वारली डिझाईन,विविध कागदी पाने व फुले,ग्रिटिंग कार्ड्स,शोभेच्या फ्रेम,आकाश कंदील,कृती गीते त्यांनी मुलांना शिकवले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खेमा केदारी व दत्तात्रय ढोंगिरे यांनी आपल्या मनोगतात चाईल्डफंड इंडिया संस्थेचे आभार मानत असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. या दोन्ही कार्यक्रमावेळी २१६ मुले या कार्यक्रमात सहभागी झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रकारांबद्दल आत्मीयता निर्माण झाली असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा शिक्षक व पालक वर्गाने व्यक्त केली. हा कार्यक्रम चाईल्डफंड इंडिया संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजीत मदने यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.जि.प.प्रा.शाळा सितेवाडी आणि गोद्रे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सितेवाडी गावचे समुह संघटक शहाजी कसबे आणि शेवंता वाघ यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!