ट्रक चालकांकडून पैसे गोळा करणारा पोलीस अंमलदार निलंबित

1 min read

अहिल्यानगर दि.१२:- शेंडी बाह्यवळण रस्त्यावर ट्रक चालकांकडून पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास दळवी याला अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढत निलंबित केले आहे.ट्रक चालकांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी (ता. ९) व्हायरल होत होता. या संदर्भात पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने चौकशी केली असता या व्हिडिओतील व्यक्ती होमगार्ड बाळू जाधव असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा व्हिडिओ सोमवारचा (ता. ८) असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यास तो हे पैसे विकास दळवी याच्या सांगण्यानुसार घेत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक घार्गे यांनी विकास दळवीचे तातडीने निलंबन करून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. होमगार्ड बाळू जाधव याची कसुरी अहवाल अपर पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!