भारताची फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी;२७ चेंडूत जिंकला सामना
1 min read
दिल्ली दि.११:- आशिया कप स्पर्धेतील ग्रुप ए मधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यूएईचा दणदणीत पराभव केला. हा सामना भारतीय फलंदाजांनी अवघ्या २७ चेंडूत जिंकला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीतील सुरुवात चांगली राहिली. गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला.
यूएईचा संपूर्ण संघ १३.१ षटकांत केवळ ५७ धावा करू शकला. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य केवळ २७ चेंडूत साध्य केले. भारतीय संघाने ४.३ षटकांत एक गडी गामवत ६० धावा केल्या.