शिक्षक दिनी शिक्षकांना जास्वंदाची रोपे भेट

1 min read

आणे दि.९:- सरदार पटेल हायस्कूल आणे मध्ये शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना जास्वंदाची रोपे भेट दिली. इयत्ता 10 वीचे विद्यार्थी व वर्गशिक्षक तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र जाधव हे होते.शिक्षक दिनी विद्यालयातील इयत्ता 1O वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली व अध्यापनाचा आनंद घेतला अशी माहिती मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली.५ सप्टेंबर शिक्षक दिन व सात सप्टेंबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेचा संस्था वर्धापन दिन असा दुग्धशर्करा योग जुळून आला व विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. 10 वी चा मुख्याध्यापक-विद्यार्थी धीरज दाते याने केले तर आभार पूर्वा दाते हीने मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!