‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी १९३२.७२ कोटी रुपये निधी मंजुर
1 min read
मुंबई दि.४:- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण १९३२.७२ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.