खून करून पसार झालेला आरोपी गजाआड

1 min read

अहिल्यानगर दि.२४:- शेवगाव येथे प्रेमसंबंधातून झालेल्या खून प्रकरणातील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथून जेरबंद केले. अफरोज सुलतान खान (वय ४५, रा. कटकटगेट, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात गोदावरी नदी पत्रात लगत एका पुरुषाचा मृतदेह १२ ऑगस्ट रोजी आढळून आला होता. या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, जि. छत्रपती संभाजीनगर) व भारती रवींद्र दुबे (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्यांचा साथीदार अफरोज खान पसार होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने आज (ता. २३) प्रवरासंगम परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!