मोशीत दारूच्या वादातून मित्रावर चाकूहल्ला
1 min read
पिंपरी दि.२३:- दारू विकत आणण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने मित्रावर चाकूने हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २०) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील मॉडर्न वाईन्स या दुकानासमोर घडली.तुकाराम संदीप साळवे (वय ३३) असे जखमी मित्राचे नाव आहे.
या प्रकरणी संदीप बाबुराव साळवे (वय ६२, रा. बोराटेवस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गणेश चंद्रकांत बोराटे (वय ४०, रा. बोराटेवस्ती, मोशी), सचिन कदम (वय ३०, रा. संजयगांधी नगर मोशी), रमेश धनगावे (वय ३१, रा.संजय गांधी नगर मोशी) आणि नवनाथ लांडगे
(वय ४०, रा. संजयगांधी नगर मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश बोराटे याला अटक केली आहे.फिर्यादीचा मुलगा तुकाराम साळवे आणि त्याचे मित्र आरोपी गप्पा मारत बसले होते.
दारू विकत आणण्याच्या कारणावरून आरोपी आणि तुकाराम यांच्यात भांडण झाले.यावेळी आरोपीने तुकारामला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.आरोपींनी चाकूने तुकाराम याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले.
