जुन्नर तालुक्यात फुलली जळगावची केळी

1 min read

आळेफाटा दि.२२:- पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील राहुल जगदिश जाधव हे गेल्या २५ वर्षांपासुन पारंपरिक पिकांसह अधिक मागणी असलेल्या केळीचे उत्पादन घेत आहेत . जैविक खतांच्या जोरावर भरघोस उत्पादन घेत चांगला नफा मिळाला आहे. कुकडी प्रकल्पातील कुकडी डावा कालवा तसेच कुकडी नदी तसेच पिंपळगाव जोगे धरणाच्या कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून गेल्याने या भागातील ऊस,केळी, द्राक्षे, बागायती पिके घेऊ घेतली जात आहेत.जाधव यांना वडीलोपार्जित असलेली जमीन व सुरुवातीपासुन शेती करण्याची आवड असल्याने आपल्या शेतात केळीचे पीक घेत आहेत. यासाठी केळीची बाजारपेठ,औषध फवारणी तसेच विक्री व्यवस्थेचा अभ्यास करून केळीचे जाधव यांनी चांगले उत्पन्न घेतले असुन पहिल्या टप्प्यात ३० टन माल निघाला.
जाधव यांनी सुरवातीला केळीचे पिक घेण्यासाठी ४ एकर क्षेत्राची निवड केली. त्यामध्ये सुरवातीला २० ते २५ ट्राली शेणखत आणुन पांगवुन ती जमीन नांगरून सुमारे एक ते दीड महिना तापत ठेवली. त्यानंतर ते शेत रोटरून त्यामध्ये सात बाय पाच फुटांच्या अंतरावर बेड पध्दतीने सरी काढली. जळगाव या ठिकाणाहुन जैन व पाटील बायोटेक या जातीची सुमारे ४७०० रोपे आणुन पाच बाय सात फुटाच्या अंतरावर लावली. तसेच यासाठी संपूर्ण केळीच्या बागेसाठी ठिबक सिंचनचा वापर केला. वेळोवेळी जैविक खतांचा वापर केल्याने झाडांना फळे देखील चांगली आली असुन झाडे मोठी झाल्यानंतर फळांच्या वजनाने झाडे पडू नये यासाठी झाडाला बांबूचा आधार दिला. जाधव यांना हे पीक घेण्यासाठी ४ लाख रुपयांचा खर्च आला असुन आता पर्यत तिस ते चाळीस टक्के माल निघाला असुन यामध्ये ३० टन माल निघाला असुन सध्या बाजार भाव एका किलोला १८ ते २० रुपये मिळत आहे. या मधुन खर्च वजा जाता एक ते दिड लाख रुपयांचा नफा मिळाला असुन सत्तर ते ऐंशी टक्के माल निघणार आहे.

प्रतिक्रिया –

“जुन्नर तालुक्यात पिंपरी पेंढार या गावात सर्वात जास्त केळीचे पिक घेतले जात असुन या पिकासाठी जमीन ही काळी असावी लागते.व गेल्या २५ वर्षांपासून हे पिक घेत आहे .तसेच रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा व जैवि औषधांचा वापर केल्याने एका घडाचे वजन जवळपास ३०ते ३५ किलो भरत आहेत व ती खायला देखील गोड लागत असल्याने या केळींना चांगली मागणी आहे व यासाठी वडील जगदिश जाधव,आई मिना,पत्नी स्वप्नाली यांची मोलाची साथ मिळत आहे.”

राहुल जाधव, केळी उत्पादक शेतकरी

(चौकट
बाजारभाव सन २०२१ साली १७ रुपये किलो,सन २०२२ साली १४ रुपये किलो,सन २०२३ साली १५ रुपये किलो, सन २०२४ साली १८ रुपये किलो,सन २०२५ साली २० रुपये किलो)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!