संग्राम भंडारे महाराज यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

1 min read

संगमनेर दि.२०:- संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे संग्राम बापू महाराज भंडारे यांचे किर्तन होते.मात्र,कीर्तन सुरू असताना महाराजांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराजांनी भाष्य केल्याने काही जणांनी विरोध केला. यावरून बराच वेळ गोंधळ झाल्याने महाराज देखील कीर्तन अर्धवट सोडून निघून गेले. यानंतर या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.याच मारहाणीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक-पुणे महामार्गावर दीड तास रास्ता रोखून धरत घटनेचा निषेध केला. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले होते.यावेळी खताळ आणि भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरात यांना टीकेचे लक्ष्य केले असून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!