दिवसा घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
संगमनेर दि.१८:- संगमनेर तालुक्यात महिला साथीदारांच्या मदतीने दिवसा घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सोपान भाऊसाहेब काळे (वय २०, लेखमापुरी, ता.शेवगाव, जि. अहिल्यानगर),
असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल भाऊसाहेब काळे, देविका अग्नेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात दिवसा घरफोडी करणारी
टोळी ही काळे आणि त्याच्या साथीदारांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस शेवगाव येथून ताब्यात घेतले. या टोळीने नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आदी ठिकाणी चोरी, घरफोडी, खून असे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
