“आळेफाटा सेंट्रल पार्क ” शहराच्या वैभवात भर घालणार; फेज १ चे भूमिपूजन संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा येथे ‘आळेफाटा सेंट्रल पार्क’ फेज १ या भव्य व्यवसायिक व गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी या ग्रह प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. यावेळी हभप राजाराम महाराज जाधव, हभप तुळशीराम महाराज सरकटे, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके, शिवसेना नेते दिलीप बामणे, मुंबई भाजपा नेते वसंत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, शरद लेंडे, मोहित ढमाले,रघुनाथ लेंडे,पंचायत समिती माजी सदस्य जीवन शिंदे,महादेव वाघ, वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप देवकर, ॲड .राजेंद्र तांबे, सुहास गायकवाड पाटील, डॉ.आनंद कुलकर्णी यांसह शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, वैद्यकीय, क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प आळेफाटा शहराच्या वैभवात भर घालणारा परिपूर्ण प्रकल्प असल्याचे मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले. उपस्थित मान्यवरांचे आभार SUV डेव्हलपर्स व आळेफाटा सेंट्रल पार्कच्या वतीने डॉ. उमेश शिंदे, डॉ.रणधीर शिंदे,विकास वाघ, शुभम ढमाले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!