वळसे पाटील महाविद्यालयात हरघर तिरंगा उपक्रम
1 min read
निमगाव सावा दि.१४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार (8 ऑगस्ट) रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. स्वयंसेवकांनी वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.मंगळवार (12 ऑगस्ट) महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालय परिसरातील कचरा, प्लास्टिक, कागद गोळा करून.
परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यास हातभार लावला. बुधवार(13 ऑगस्ट) महाविद्यालय सचिव मा. परेश घोडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वयंसेवकांसाठी हर घर तिरंगा अभियान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारत माता आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल पडवळ, कला शाखा समन्वयक प्रा. सुभाष घोडे यांनी विद्यार्थ्यांना तिरंगा अभियानाचे महत्त्व सांगितले.
प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वितरण करून आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. महाविद्यालय परिसरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
त्यामार्फत देशभक्तीचा संदेश देऊन स्वच्छता, एकता आणि शैक्षणिक जागृतीचे महत्त्व समजावून सांगितले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधुरी भोर, प्रास्ताविक प्रा.ज्योती गायकवाड व आभार प्रा.आकाश धुमाळ यांनी व्यक्त केले.
