एलसीबीत जुन्या अंमलदारांना पूर्णविराम; नवे ३९ अंमलदार

1 min read

अहिल्यानगर दि.१४:- अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या बदली प्रक्रियेलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी (ता.१४) ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. या पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत काम करणाऱ्या अंमलदारांना पूर्णविराम देऊन नव्या अंमलदारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नवा गडी, नवे राज्य स्थानिक गुन्हे शाखेत दिसून येत आहे. येणाऱ्या काळात गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचे कौशल्य दिसणार आहे. विरप्पा करमल,किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळू खेडकर, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अमृत आढाव, सुनील मालणकर, रमिझराजा आतार, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, गणेश लोंढे, विष्णू भागवत, भिमराज  खेसे, राहुल व्दारके, गणेश लबडे, हृदय घोडके, रमेश गांगडे, सुवर्णा गोडसे, सुयोग सुपेकर, रिचर्ड गायकवाड, अमोल आजबे, सुनील पवार, विजय पवार, शामसुंदर जाधव, सतीश भवर, सोनल भागवत, राहुल डोके, वंदना मोढवे, प्रकाश मांडगे, मनोज  साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, योगेश कर्डीले, शामसुंदर गुजर, चिमा काळे, आणि सोमनाथ झांबरे अशा ३९ अंमलदारांची बदली थेट स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!