नारायणगाव पोलिसांची कामगिरी;एअरगन, गावठी पिस्तुल, दोन काडतुसे, कोयते हस्तगत;दोघांना अटक

1 min read

नारायणगाव दि.१३:- नारायणगाव (ता. जुन्नर) परीसरात एक एअरगन, एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते आणि मोटारसायकलच्या चैनस्पॉकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार व स्वीफ्ट गाडी असा एकूण पाच लाख २७ हजार शंभर रुपये किंमतीचा मुद्येमाल नारायणगाव पोलिसांनी जप्त करून. दोन जणावर गुन्हा दाखल केल्याची महिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.अटक सार्थक जयसिंग नेहरकर व राजू अजितसिंग रजपूत (दोन्ही रा. येडगाव) अशी झालेल्यांची नावे आहेत. येडगाव येथील सार्थक नेहरकर याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती (दि.८) जुलै रोजी मिळाल्यानेपोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील, हवालदार लोखंडे, गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, रघतवान, गेंगजे, जाधव, चौगुले यांची टिम तयार करून सार्थकचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने राजू रजपूत याची गाडीमध्ये एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक एअरगन, दोन कोयते व मोटारसायकलच्या चैनस्पॉकेटच्या व सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार असे सांगितल्याने पाटील व त्यांच्या टीमने राजू रजपूत त्याला गाडीसह ताब्यात घेत पाहणी केली. त्या गाडीत एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक एअरगन, दोन कोयते सापडले. आरोपींना जुन्नर न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!