दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा
1 min read
निमगाव सावा दि.१३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे, कला विभाग समन्वयक प्रा सुभाष घोडे,
वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा.ज्योती गायकवाड, ग्रंथपाल मंगल उनवणे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा.अनिल पडवळ, विज्ञान विभाग समन्वयक प्रा.प्रवीण गोरडे, इतर प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय विज्ञानातील अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विशेषतः त्यांच्या “पाच ग्रंथालय शास्त्र सिद्धांतां”चे महत्त्व अधोरेखित केले.महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मंगल उनवणे यांनी प्रास्तविकात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ग्रंथालयाचा अधिक प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन केले.
प्रा. अनिल पडवळ यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ग्रंथालयाचा उपयोग वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वी ठरेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुभाष घोडे यांनी तर प्रा. योगेश भालेराव यांनी आभार मानले.
