चुना मिश्रित तंबाखूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक चालकास अटक; ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कारवाई

1 min read

बेल्हे दि.१२:-आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला चुना मिश्रीत मिराज तंबाखु तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास जेरबंद करत ४५ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल केला. जेरबंद याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टाटा कंपनीचा एम. एच. १८. बी. झेड. २३५० या वाहणामधुन बेकायदा चुना मिश्रीत मिराज तंबाखु वाहतुक होणार असून सदर ट्रक हा नाशिक बाजुकडून आळेफाटाकडे येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, त्याअनुषंगाने पुणे नाशिक हायवे रोडवर पिपळवंडी बस स्टॅण्ड चौकात आळेफाटा पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडील शोध पथक असे नाकाबंदी करीत असताना. सदरचा ट्रक हा ट्रक संशयीत रित्या मिळून आल्याने सदर ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरच्या ट्रकची तपासणे केली असता,त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला चुना मिश्रीत मिराज तंबाखू २५ लाख २० हजार रूपये किंमतीची व २० लाख रूपये किंमतीचा ट्रक असा एकुण ४५ लाख २० हजार किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ट्रक चालक अल्तमश रहेमततुल्लाह खान वय ३८ वर्षे रा.आग्रारोड एस.एस. कीपीएस लेडीज हॉस्टेल विट भटठी देवपुर धुळे ता.जि. धुळे यास अटक केली असुन इतर दोन फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक संदिप सिंग गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडा, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक श विश्वास जाधव आळेफाटा पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहा फौज दिपक साबळे, पो. हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, संदिप वारे पो. कॉ. नविन अरगडे, शैलेश वाघमारे, अक्षय नवले, सचिन कोबल, गणेश जगताप, ओंकार खुणे, पोलीस मित्र मंगेश कदम, यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!