राजुरीत भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न;४८५ नागरिकांनी घेतला लाभ
1 min read
राजुरी दि.१२:- श्री खंडेराया सभागृह राजुरी ता.जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे,स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे,दिव्यदृष्टी दिव्यांग संस्था राजुरी, हिरकणी सेवा प्रतिष्ठान राजुरी , राध्येशाम सशक्तीकरण केंद्र जुन्नर,ओम साई दिव्यांग समूह,ग्रामपंचायत राजुरी व उंचखडक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी यु डी आय डी कार्डची ऑनलाईन नावनोंदणी तसेच आवश्यक साहित्य वाटप पूर्व तपासणी व नावनोंदणी करण्यात आली. तसेच आधारकार्ड दुरुस्ती शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हिरकणी सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमलता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास ज्येष्ठ आजी आजोबांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले.या शिबिरात ४८५ नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये हृदयरोग,Thinking,कॅन्सर पूर्व तपासणी,हाडांचे आजार,
स्त्रीरोग,बालरोग,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग, बी पी,शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या.यासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा,डोके हॉस्पिटल नारायणगाव, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, श्रीकृष्ण दातांचा दवाखाना,हिंद लॅब जुन्नर व प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी यांचे सहकार्य लाभले.
तसेच स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांची यु डी आय डी कार्ड ची ऑनलाईन नावनोंदणी व आवश्यक साहित्य वाटप पूर्व तपासणी व नावनोंदणी करण्यात आली. महा ई सेवा केंद्र राजुरी यांच्या वतीने अनेकांची आधारकार्ड दुरुस्ती देखील यावेळी करण्यात आली.
शिबिराचे उदघाटन राजुरीच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर या प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती दीपक औटी, उपसरपंच माऊली शेळके, डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई ,समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाले,
गणेश दूध डेअरी चे चेअरमन सुभाष औटी, ग्राहक पंचायत अध्यक्ष बाळासाहेब औटी, डिसेंट फाउंडेशचे सचिव डॉ एफ.बी.आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, उंचखडक गावचे सरपंच अजय कणसे, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे ,दीपक चव्हाण,डॉ सुमीत लव्हाळे,
डॉ अमेय डोके,डॉ आकाश आवारी,प्रकाश पाटील, संपत हडवळे, मोहन नायकोडी,सखाराम गाडेकर,अजय पवार, जी.के. औटी ,जयसिंग औटी, सुप्रिया औटी,संगीता शेळके ,स्मिता कणसे ,अरविंद पंडित,ज्ञानदेव बांगर, नांदा खोमणे,गौरव घंगाळे, रवी गाडगे,आदी मान्यवर डॉक्टर्स, तपासणी तज्ञ, परिचारिका,आशासेविका ,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी हेमलता शिंदे,अनंत हाडवळे, अजित पठाण, कैलास आवटे,दत्तात्रय कणसे संदीप कणसे, ज्ञानेश्वर मालुसकर, मारुती आवटे,फिरोज चौगुले, बाळासाहेब हडवळे,कैलास हडवळे,कैलास औटी,सचिन औटी, अश्विनी हाडवळे, जयश्री वाळुंज,स्वाती आवटे, पल्लवी औटी,सारिका डहाळे,सपना फाफाळे,कविता औटी,गुलनाज जमादार,कविता औटी ,कांचन हाडवळे.
