विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीत रक्षाबंधन साजरे
1 min read
साकोरी दि.१०:- साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी मध्ये रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा झाला.याप्रसंगी ज्युनिअर के.जी. ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रक्षाबंधन सणानिमित्त विद्यालयात सकाळच्या सत्रात राखी बनवणे, रांगोळी,मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने हस्तकला साहित्य वापरून, तसेच टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून अतिशय सुंदर व आकर्षक अशा राख्या बनवल्या.यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले.काही विद्यार्थ्यांनी रांगोळी तसेच मेहंदी स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले.
सर्वच स्पर्धांचे परीक्षण करण्यात आले.यामध्ये विद्यालयाच्या प्राचार्या, विभाग समन्वयक,कलाविभाग प्रमुख तसेच CCA विभागाने परीक्षण करून क्रमांक देण्यात आले.तसेच यानंतर दुपारच्या सत्रात, रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यालयातील सर्वच इयत्तेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थी
व गुरुजनांना प्रेम व आपुलकीने राख्या बांधल्या.याप्रसंगी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगून बंधुत्वाचा भाव जोपासण्याचे आवाहन प्राचार्या रुपाली पवार भालेराव यांनी केले. आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
