लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्ष सुरुच राहणार; रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

1 min read

मुंबई दि.१०:- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबईत केली. लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या १,५०० रुपयांच्या हप्त्यात लवकरच आणखी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाली होते. यावेळी फडणवीस यांच्यासह आमदार मिहिर कोटेचा हेदेखील उपस्थित होते. ‘विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि अंमलबजावणी सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी शिव्याशाप दिले, ते न्यायालयातही गेले. मात्र लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार राज्यात आले. त्यानंतर आजच्या घडीला अडीच कोटी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‌अमेरिका, चीन जपान, कोरिया आदी देशांनी विकास केला, त्यात ५० टक्के महिला समाज असून अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक महिला आहेत. त्यामुळे समृद्ध प्रवास करायचा तर महिलांना घेऊन केला तर शाश्वत प्रवास होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि गेल्या १० वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी यांनी उपाययोजना केल्या. बेटी बचाओ, बेटी पढाओ यापासून झालेली सुरुवात ती लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात २५ लाख महिला लखपतीदीदी तयार केल्या असून ही संख्या एक कोटींवर नेणार आहोत,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!