दुचाकीवरून दारुची वाहतूक; गुन्हा दाखल

1 min read

बेल्हे दि.५:- गावठी हातभट्टीची तयार दारु विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून वाहतूक करणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील २२ लिटर गावठी दारु आणि दुचाकी असा १२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई नगर तालुक्यातील खांडके गावचे शिवारात आगडगाव जाणारे रस्त्यावर केली. गोकुळ राजेंद्र धायगुडे (वय २५, रा झापवाडी, ता. नेवासा), प्रदिप उर्फ बबलु गजानन आल्हाट (वय ४४, रा. पिपळगाव उज्जैनी, ता. नगर ) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळालेल्या माहितीनुसार खांडके गावाच्या शिवारात आगडगाव कडे जाणाऱ्या रोडवर पवार तांड्याजवळ दुचाकीवर दोन कॅन लावून गावठी दारूची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार रात्री गस्त पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ हजार २०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!