समर्थच्या प्रवेशवाढीस शासनाची मान्यता; इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ३० वरून ६० तर एमबीए १२० वरून १८० साठी परवानगी

1 min read

बेल्हे दि.४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे (बांगरवाडी) या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबी ए) या व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमासाठी १२० वरून १८० प्रवेश क्षमतेत वाढ करण्यासाठी तसेच इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या पदवी अभियांत्रिकी शाखेमध्ये ३० वरून ६० प्रवेश क्षमता करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाने परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना एमबीए आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेकविध करियच्या उपलब्ध संधी हस्तगत करता येणार आहेत.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.ऊर्जा क्षेत्रात,उत्पादन क्षेत्रात,किंवा ऑटोमोटिव्ह उद्योगात काम करू शकता.तसेच,दूरसंचार,एरोस्पेस आणि वैद्यकीय उपकरणे यांसारख्या क्षेत्रांतही काम करण्याची संधी आहे.वीज निर्मिती,वितरण आणि व्यवस्थापनात, ऑटोमेशन,रोबोटिक्स,औद्योगिक नियंत्रण प्रणाली, इलेक्ट्रिक वाहने,ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन नियंत्रण प्रणाली, दूरसंचार प्रणाली, नेटवर्क डिझाइन आणि 5G तंत्रज्ञान, विमानांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम, नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टीममध्ये काम करण्याची संधी आहे. वैद्यकीय उपकरणे,इमेजिंग सिस्टीम आणि जीवन समर्थन प्रणालीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सांगितले.ज्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ मध्ये एमबीए साठी प्रवेश घ्यायचा आहे परंतु काही कारणास्तव एमबीए एमएच-सीईटी देऊ शकले नाही त्यासाठी ATMA MBA प्रवेश परीक्षा ही एक सुवर्णसंधी आहे. ATMA MBA CET ची प्रवेश परीक्षा ही दिनांक १ जून २०२५ रोजी होणार असून दिनांक १८ मे २०२५ पर्यंत विद्यार्थी अर्ज नोंदणी करू शकतात.महत्त्वाची बाब म्हणजे सदर परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते व राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊ शकतात.एम बी ए करण्यास उत्सुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीची ही एक शेवटची संधी असून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी केले आहे.ई-कॉमर्स,आरोग्य,शिक्षण,सहकार व तंत्रज्ञान, ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ती कमतरता भरून काढण्यासाठी हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहेत.उत्तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गाच्या मागणीनुसार बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी व ग्रामीण भागातील संशोधनात्मक उपक्रमांना चालना व प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे नवीन अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सांगितले.या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन,सी ई टी सेल,डी टी ई मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून अधिक माहितीसाठी प्रा.प्रदीप गाडेकर-९६३७२३८०३४ यांच्याशी संपर्क साधावा तसेच शासनाच्या व सी ई टी सेल च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!