व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल येथे ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ व ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती’ उपक्रम

1 min read

वडगाव कांदळी दि.४:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथे पर्यावरण संरक्षण आणि सर्जनशीलतेचा संदेश देणारे दोन अनोखे उपक्रम शनिवारी विद्यार्थ्यांच्या सहभागातून उत्साहात पार पडले. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ अर्थात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा उपक्रम आणि ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती’ हे दोन उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे उत्तम उदाहरण ठरले.”बेस्ट फ्रॉम वेस्ट “या उपक्रमांतर्गत घरात उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंमधून सुंदर आणि उपयुक्त राखी बनवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. जुने कागद, दोऱ्या, फुगे, बटन, मण्यांचा वापर करून. त्यांनी आकर्षक आणि रचनात्मक राख्या तयार केल्या. यामध्ये त्यांनी स्वदेशी व हस्तनिर्मित राख्यांचे महत्त्व अधोरेखित केले.त्यानंतर इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षिका मानसी पाचपुते यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवण्याचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक दिले. विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यास मदत झाली.या दोन्ही उपक्रमांचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी शाळेच्या समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे आणि इतर शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन दिले.या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात सर्जनशीलता, स्वावलंबन, पर्यावरणप्रेम आणि संस्कारांची बीजे रोवली गेली. यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता, वास्तव जीवनात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी शिकले, हे विशेष!कार्यक्रमास विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!