शिंदेवाडीत अनोळखी महिलेचा मृतदेह
1 min read
शिंदेवाडी दि.३:- शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथे रविवार दि.३ रोजी ५० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ८ वाजता शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे गावातील देवी माता मंदिरात दर्शनासाठी गेले असता.
येथील एका झाडाखाली अनोळखी महिलेचा वय अंदाजे ५० ते ५५ मृत अवस्थेत खोडाला टेकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर आळेफाटा पोलिसांना संपर्क केला असता तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता.
सदर महिलाही वळणवाडी नारायणगाव ता.जुन्नर येथील एका इसमासोबत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महिलेच्या उजव्या गालाला सुजलेले दिसते तसेच डाव्या डोळ्याच्या खाली काळी निळे झालेले दिसले.सदर महिलेच्या अंगावरती राखाडी कलर रंगाचे जर्किंग व गुलाबी
साडी त्यावर बारीक पांढऱ्या रंगाची डिझाईन आहे. हरिभाऊ शिंदे यांनी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.
