चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारे दोघे जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
अहिल्यनगर दि.३०:- नगर घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करणारे दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महेश आबासाहेब शिरसाट (वय २६), गौरव शहादेव शिरसाट (वय २५, दोघे रा.म्हसले,
ता. नेवासा अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रवाशांना लुटमार करणारे दोघे संशयित भेंडा येथून नेवासा फाट्याकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ असा एकूण सहा लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,
पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.
