मोठी बातमी! रशियात मोठा भूकंप; जपानमध्ये त्सुनामी
1 min read
रशिया दि.३०:- रशिया बुधवार (दि.३०) एका शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की,रशियाच्या कामचत्स्की द्वीपकल्पाजवळ एक शक्तिशाली भूकंप झाला. संस्थेने सांगितले की, भूकंपाची सुरुवातीची तीव्रता ८.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी यंत्रणेने रशिया आणि जपानच्या काही किनारी भागात त्सुनामी लाटा दिसून येत आहेत. ३ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामीच्या लाटा
वायव्य हवाईयन बेटे आणि रशियाच्या किनारी भागात भरती-ओहोटीच्या पातळीपेक्षा ३ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत.
एजन्सीने जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यासाठी एक मीटर पर्यंत त्सुनामीचा इशारा जारी केला होता. जपानच्या होक्काइडोपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर भूकंप झाला होता. या भूकंपामुळे अमेरिकेच्या अलास्का व इतर ठिकाणच्या किणारी भागात समुद्राच्या लाटा निर्माण झाल्या आहेत.
