महाविद्यालयाचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.३०:- दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा ता. जुन्नर याचा सोळावा वर्धापन दिन दिनांक २८ जुलै २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार होते. संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे गुरुजी, मा.अब्दुल पटेल, दत्तात्रय घोडे गुरुजी, संस्थेचे खजिनदार व निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राधापकेतर कर्मचारीव विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि श्री पांडुरंग प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविकात प्रा. अनिल पडवळ यांनी संस्थेच्या गेल्या १६ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.या कार्यक्रमात रुबीना मणियार,रवींद्र हिवराळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून महाविद्यालयांमध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधा,आपले गुरुवर्य आणि महाविद्यालयाप्रती आत्मीयता व्यक्त केली. अनुष्का अवचर या विद्यार्थिनीने कवितेमधून महाविद्यालय विषयी असणारा जिव्हाळा व्यक्त करून उपस्थित त्यांची मने जिंकली. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ह.भ.प.मयूर महाराज डुकरे यांनी आपल्या कॉलेज जीवनातील अकरा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखाप्रमुख प्रा.ज्योती गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.नीलम गायकवाड यांनी आपल्या मनोगतामधून महाविद्यालयातील जडणघडणी विषयी आठवणी व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री पांडुरंग पवार साहेब यांनी महाविद्यालय स्थापनेमागचा उद्देश, महाविद्यालयाची स्थापना आणि 16 वर्षात महाविद्यालयाचा झालेला प्रवास यासंदर्भात माहिती देताना यापुढे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपस्थिती वाढवावी, चांगले ज्ञान आत्मसात करावे, आपल्या गुणवत्तेने, जिद्द, मेहनत, कष्टाने चांगले यश संपादन करावे.आणि स्वतःचे नाव जागतिक पटलावर उमटावे. यासाठी महाविद्यालय आपणास नेहमीच सहकार्य करेल. आजपर्यंत महाविद्यालयातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा उल्लेख करून, त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. वर्धापन दिनाचा संपूर्ण कार्यक्रम उत्साह, प्रेरणा आणि महाविद्यालयाबद्दल अभिमान निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी भोर, तर आभार प्रा. सुभाष घोडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!