जुन्नर तालुक्याचं अश्वासक सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणजे अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.२३:- कमालीचा लोकसंग्रह व अनेक तरूणांना आपलेसं वाटणारं उमदं अश्वासक व चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणजे माजी आमदार अतुलशेठ बेनके.एक अभ्यासू व उच्चशिक्षित नेता म्हणून बेनके यांचेकडं तालुका पहात आहे,बेनके परिवाराने राजकारणात अनेकदा जय पराजय पचविले पण कधी डगमगले नाहीत.1985पासून स्व वल्लभशेठ बेनके यांनी सक्रिय राजकारणात भाग घेत बेनके परिवाराचा दबदबा निर्माण करीत जनसेवेचा वसा घेवून मोठा लोकसंग्रह केला म्हणूनच त्यांना अनेकदा आमदार म्हणूून जनतेनं संधी दिली,तसंच उजवं काम आज अतुल बेनके करताना दिसत आहेत,गेली पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना त्यांचे काळातील कोरोनाचे संकट, नंतर महाविकास अघाडीचा प्रयोग सत्तेत झाला त्यातून बदलेली सरकारं, नव्याने महायुतीचा झालेला उदय व शेवटी शेवटी स्थापन झालेलं सरकार, म्हणजे सत्तेत, विरोधात व परत रा काँ पक्ष दुभागल्यावर पुन्हा सत्तेत अशा अनपेक्षित स्थितीतील त्यांचा आमदारकिचा काळ मोठा कसोटीचा राहीला,यातूनही त्या्नी तालुक्याला 3200 कोटी रूपयांचा निधी मिळविलाच,त्यात चिल्हेवाडी बंद पाईपलाईन योजनेला शंभर कोटी,बिबट सफारीला ऐंशी कोटी,मीना खोऱ्यातील सिंचन,चाऱ्या पोटचाऱ्या अस्तरीकरण, शिवनेरी परिसर विकास,हॅम मधील रस्ते, अदिवासी भागातील रस्ते निर्माण व मजबूतीकरण, अष्टविनायकापेकी असलेली तालुक्यातील देवस्थाने यांना परिसर विकासाला मोठा निधी,अशी कितीतरी कामं पुढे नेली, पक्षफुटीच्या नंतर भूमिका घेण्यात झालेली दोलायमान स्थिती यामुळे निवडणूक लढण्यासाठी जी जय्यत तयारी करायची असते. तीला लागलेला विलंब,यामुळे विधानसभेला बसलेला फटका या व अनेक कारणांनी पराभव वाट्याला आला, विकासकामं पोहचवणं,जाहीरात बाजी करणं,याकडे लक्ष न दिल्याने कदाचित अधिकचा फटका बसला,पण तरीही लढवैया बाणा अंगात असल्याने न थकता अविरतपणे जनतेमध्ये राहून आजही कामं सुरू आहे,जनतेच्या सुख दु:खात सामिल होवून अडीअडचणीत सदैव उभेराहून आधारवड बनून पुढं जातं आहेत.तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला पाहीजे, नवी पिढी राजकारणात आली पाहीजे,एकुन समाजव्यवस्था व जातीय,धार्मिक सलोखा कायम राहीला पाहीजे या भूमिकेतून राजकारण करणारे अतुलजी बेनके हे सदैव कार्यमग्न दिसत आहेत,जुन्नरच्या वैभवात भर टाकणारी अनेक दर्जेदार कामं आमदारकिच्या काळात बेनके यांनी केली आहेत,जुन्नर न्यायालयाची दर्जेदार सुसज्ज इमारत व सेशन कोर्टाचं सिनिअर डीव्हीजन बेंच जुन्नरला मंजूर करून कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले,जुन्नर तहसिलदार कार्यालय व सुसज्ज इमारतीचे काम प्रगतिपथावर आहेच,अनेकविध ग्रामपंचा़तीच्या इमारती, तलाठी कार्यालये ,ग्रामिण रूग्णालयांचे श्रेणीवर्धन करून नव्या इमारतींसाठी निधी मंजूरी,कितीतरी कामं सुरू आहेत,तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आमदार म्हणून बेनकेंनी केलं आहे. हे अधोरेखीत करावं लागेल, घरातील सर्व मंडळी अविरत समाजकार्यात मग्न असलेली दिसून येतात,मोठे बंधूराज डाॅ अमोल बेनके हे चाकण परिसरात अदययावत रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा देतात,धाकटे बंधू अमितदादा बेनके हे तरूणांचं संगठन उत्तमप्रकारे करीत असून शेती व नियोजनाचा व्याप सांभाळत आहेत,पत्नी सौ गौरीताई तर सदोदित महिलांच्या संपर्कात राहून महिलासंघटनाची महत्वाची धुरा सांभाळत आहेत,शिवाय ब्लमुमिंगडेल शाळेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करीत तालुक्यातील एक नावाजलेली शाळा हा नावलौकिक जपत आहेत, एकुणच अतुलजी बेनके व परिवार समाजाभिमूख काम करत राहून सातत़्याने समाजातील सर्व घटकांसाठी प्रयत्नशील दिसतात.ना अजितदादा पवार साहेबांचा विशेष लोभ व प्रेम लाभलेले अतुलशेठ बेनके हे तीसऱ्यांदा आमदारकिच्या निवडणूकीला सामोरे गेले,दोन वेळा पराभव वाट्याला आला एकदा आमदार झाले.त्यांचं हे राजकारणात राहून समाजकारण करणं सतत सुरू राहो,त्यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो,त्यांच्या या वाढदिवशी त्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करीत असताना आपण घेतलेला समाजसेवेचा वसा कधीही टाकू नका,स्व लोकनेते माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांचा आदर्श वारसा तुम्हाला लाभला आहे,तो पुढे नेत रहा,तालुका अधिक उंचीवर न्या,तालुक्याचा नावलौकिक सांभाळा याच सदिच्छा व शुभेच्छा देतो.

शब्दांकन
प्रितम नंदकुमार काळे
उपसभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर पुणे
मा सरपंच ग्रा पं आळे,जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!