व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थांनी अनुभवले नेतृत्वगुण, शिस्त, लोकशाही मूल्यांचा संगम

1 min read

वडगाव कांदळी दि.२०:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांचा विकास आणि शाळा व्यवस्थापनात सहभाग वाढवण्यासाठी Students Election Council ही लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रकिया उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली.या विद्यार्थ्यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा अभिमान, नेतृत्वाचे कौशल्य आणि जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे यांच्यासह सर्व शिक्षकांच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली.या प्रक्रियेमध्ये हेड गर्ल, हेड बॉय, हाउस कॅप्टन, व्हाईस कॅप्टन अशा विविध पदांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नामनिर्देशन सादर केले. त्यानंतर प्रचाराच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांनी आपापल्या पदांसाठी विचार मांडले, पोस्टर लावले आणि जनसंपर्क साधला.ही संपूर्ण निवडणूक पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक समिती कार्यरत होती.मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पद्धतशीर रांगेत उभे राहून आपले मतदान केले. गोपनीयतेच्या तत्त्वानुसार मतदान पेटीत मतपत्रिका टाकण्यात आली. ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली. यानंतर लवकरच विद्यार्थ्यांचे निकाल मतमोजणी करून निपक्षपातीपणे व पारदर्शकतेने जाहीर करण्यात येतील.या निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची जाणीव, निर्णयक्षमता, प्रचार कसा करावा, जबाबदारी कशी पेलावी आणि नेतृत्वाची कला यांचे थेट अनुभव मिळाले. ही निवडणूक प्रक्रिया चालू असताना विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे यांनी देखील यावेळी आपली उपस्थिती दर्शविली.या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः शिक्षकांनी घेतलेली मेहनत व संयोजन विशेष लक्षणीय होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले.या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही साक्षरता, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांची बीजे रोवली गेली, हे विशेष.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!