आळेफाटा पोलीसांनी विमल गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३.३६ लाख रूपये किंमतीचा मुद्देमालासह केली अटक
1 min read
आळेफाटा दि.१७:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीसांनी विमल गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३.३६ लाख रूपये किंमतीचा मुद्देमालासह अटक केली आहे. या बाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या
माहितीनुसार दि.११ रोजी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिकहुन आळेफाटा कडे गुटख्याची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या अनुषंगाने पुणे – नाशिक महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशनचे हद्दीत नाकाबंदी करण्यात आल्यानंतर नाशिक मार्गे आयशर कंपनीचा एम.एच.०४एच.डी.७३५० हा ट्रक आल्यानंतर
हा ट्रक संशयीत रित्या मिळून आल्याने सदर ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता. तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचा ट्रक चेक केला असता, त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला
बिमल कंपनीची सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा एकुण २८ लाख ३६ हजार ८०० किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन ट्रक चालक सादीक अब्दुलवहाब शेख (वय ४३ वर्षे रा चुनारगल्ली चोपडा ता चोपडा जि. जळगाव) व इतर १ वर गुन्हा दाखल करण्यात आला असून
त्याच्याकडून एकुण ४३ लाख ३६ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल ट्रकसह जप्त करण्यात आला आहे. तसेच सादीक अब्दुलवहाब शेख यांस गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन फरार आरोपीचा शोध चालु आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, स्था.गु.शा.पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोपट कोकाटे,
विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पंडीत थोरात, नविन अरगडे, शैलेश वाघमारे, विष्णु दहिफळे, गणेश जगताप, ओंकार खुणे, संतोष साळुंके, भुजगराव सुकाळे, पोलीस मित्र मंगेश कदम, सोमेश्वर भंडलकर यांनी केली आहे.
