आळेफाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह

1 min read

आळेफाटा दि.१६:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथे संत सावतामहाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे. हा सप्ताह गुरुवार (दि. १७) ते गुरुवार (दि. २४) या काळत येथील संत सावता महाराज मंदिरात होणार आहे. या सप्ताहासाठी आळेफाटा, वडगाव आनंद, पादीरवाडी, मुंबईकर मंडळी या ग्रामस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. यामध्ये पहाटे काकडा, सकाळी विष्णुसहस्रनाम प्रार्थना, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व नंतर जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताहात निवृत्ती महाराज देशमुख, ज्ञानेश्वर माऊली लंगोटे,कबीर महाराज आत्तार,वैष्णवी सरस्वतीदीदी, संग्रामबापु भंडारे पाटील, गणेश महाराज शिंदे, ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांची कीर्तनसेवा होणार आहे. बुधवार (दि. २३) दुपारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर गुरुवारी (दि. २४) होणाऱ्या बजरंग महाराज कर्जुलेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचे सांगता होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!